रस्त्याच्या कामासाठी महिलांचे अमरण उपोषण
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
उदगीर:रस्ता कामाची मंजूरी होऊन सुध्दा ठेकेदाराच्या हेकेखोर पणामुळे पाच वर्षापासुन रस्त्याचे काम होत नसल्याने रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी मलकापूर ग्रामंपचायत हद्दीतील नविन वसाहत पांचाळ काॅलणी येथील महिला व पुरुषांनी सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले असता सदरील काम तात्काळ सुरु करण्याचे लेखी आश्वासन बांधकाम विभागाने दिल्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले.
मलकापुर ग्रामंपचायत नविन वसाहत पांचाळ काॅलणी येथील जनतेनी सिमेंट रस्त्या करावे अशी मागणी तत्कालिन मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या कडे केली असता ना.संजय बनसोडे यांनी सन 2021 मध्ये मुलभुत सुविधा अंतर्गत सिमेट रस्त्यासाठी 15 लाख रुपयाचा निंधी मंजूर केला.व या कामाचे टेंडर झाले व सदरिल टेंडर विशाल राजकुमार सताने या ठेकेदाराने 14.85%कमी दराने निविदा भरल्याने त्या ठेकेदारास कार्यारंभ आदेश 1/9/2022 रोजी दिले असताना आजपर्यंत सिमेट रस्त्याचे काम केले नाही यामुळे या भागात राहणार्या जनतेला त्रास होत आहे. सिमेट रस्ता तात्काळ करावा अशी मागणी या भागातील जनता ग्रांमपंचायतकडे खेटे मारत होती परंतू सदरिल सिमेट रस्त्याचे टेंडर निघाले असल्यांने व सदरील काम सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत होत असल्यांने ग्रांमपंचायत रस्त्याचे काम करण्याची इच्छा असुन ही करु शकली नाही. माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या कडे सरपंच गुरुनाथ बिरादार यांनी पांचाळ काॅलणी येथील जनतेची रस्ता नसल्यामुळे अडचण होत असुन आपण लक्ष घालून संबधीत गुत्तेदारास तात्काळ सिमेट रस्त्याचे काम सुरु करुन जनतेची गैर सोय दुर करावी अशी मागणी केली असता आ.संजय बनसोडे यांनी सा.बा. विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती डोके यांना सिमेट रस्ता तात्काळ सुरु करण्या सुचना दिल्या तरी ही संबंधीत गुत्तेदार काम करत नसल्याने या भागातील ग्रा.प.सदस्य , महिला व नागरिक यांनी उदगीर येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर 28 मे रोजी अमरण उपोषणास बसले . प्रशासनाने उपोषण कर्त्यांची तात्काळ दखल घेऊन कार्यकारी अभियंता श्रीमती डोके यांनी पांचाळ काॅलणी येथी सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने व अभियंता श्रीमती गोटे ,जे.ई. अलका राठोड, जे.ई. खंदारे यांनी लेखी पत्र दिल्याने
उपोषणकर्त्यांनी अमरण उपोषण स्थगित केले. यावेळी सरपंच गुरुनाथ बिरादार,ग्रामसेवक संतोष पाटिल आदी उपस्थित होते.
या अमरण उपोषणा मध्ये ग्रा.प.सदस्य सतिश बिरादार,ग्रा.प.सदय गंगाधर पवार,चूअरमन मुकेश भालेराव यांच्या सहलक्ष्मीबाइ कोठारे,लक्ष्मीबाई मुंडे, लक्ष्मीबाई पांचाळ, संगीता नागपुर्णे, हरीबाई गिरी, पदमावती घोगरे, वच्छला पाटिल, सुनिता मुसळे, विमलबाई काळे, सुनिता माने, पार्वती केंद्रे,अनुसया सुर्यवंशी, लक्ष्मीबाई चेरेकर, भागिरथी हाळे, लताबाई हंसनाळे, जयश्री दोलदापके, संगीता हालकरे, रत्नमाला फड, शालूबाई बुर्शे,अशोक बिरादार गोविंद माने, बालाजी भांगे संतोष पाटिल आदी सह पांचाळ काॅलणी येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने अमरण उपोषणास बसले होते.
0 Comments