पिंपरी येथे शेती विकत देतो म्हणून १३ लाख ७५ हजार ८३२ रुपये उकळले
उदगीर:तालुक्यातील पिंपरी येथे शेती विकत देतो म्हणून फिर्यादीची १३ लाख ७५ हजार ८३२ रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक माहिती अशी की पिंपरी शेत शिवारात आरोपींने फिर्यादीस शेती विकत देतो म्हणून १२ डिसेंबर २०२४ ते ४ मार्च २०२५ पर्यंत १३ लाख ७५ हजार ८३२ रुपये घेवून जमीन न देता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली प्रदीप अंगद केंद्रे राहणार गुत्ती ता जळकोट यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी इम्रान हाश्मी सय्यद राहणार उदगीर यांच्यावर गुरंन ३२०/२५ कलम ३१८,(२) ३१६,३५१,(२) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रायफल्ले मॅडम हे करीत आहेत.
0 Comments