जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया
उत्तराखंडच्या जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत श्रीकांत राठोड यांनी कोच म्हणून काम पाहिले
आणि टम्बलिंग जिम्नॅस्टिक्स
राष्ट्रीय अजिंक्यपद २०२५
०७ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२५ डेहराडून,उत्तराखंड मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून एक संघ निवडला गेला होता त्या संघामध्ये श्रीकांत देविदास राठोड यांची महाराष्ट्र संघाचे मुख्य कोच म्हणून निवड झाली श्रीकांत राठोड हे सध्या हिंजवडी पुणे येथील श्री स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये मुलांना जिम्नास्टिकचे मार्गदर्शन करीत आहेत श्रीकांत राठोड यांची पुणे जिम्नास्टिक अकॅडमी मधील खेळाडूंची निवड झाली होती त्यामध्ये 1)नकुल कारेकर २)सम्राट सोनी ३) पाखी बन्सल यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली होती ह्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे नावलौकिक केले त्यामध्ये बारा वर्ष वयोगटातील नकुल कारेकर यांनी महाराष्ट्र संघासाठी सुवर्णपदक पटकाविले
सम्राट सोनी संपूर्ण भारतामधून आलेल्या खेळाडूंमधून तो ४ क्रमांकावर राहिला,१४ वर्षाखालील मुली गटातून पाखी बन्सल यांनीही चांगली कामगिरी केली पुणे स्पोर्टस अकॅडमी मध्ये श्रीकांत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुले सराव करत असतात,श्रीकांत देविदास राठोड हे एक चांगले उत्कृष्ट खेळाडू राहिल्याने मुलांना मार्गदर्शन करत आहेत,श्रीकांत राठोड हे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील बोरतळा तांड्याचे रहिवासी आहेत, श्रीकांत राठोड यांनी महाराष्ट्र संघासाठी व भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे, मागच्या वर्षी हॉंगकॉंग येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप मध्ये श्रीकांत राठोड यांनी भारताचे कोच म्हणून त्यांची निवड झाली होती,उदगीरकरांसाठी व लातूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे,इयत्ता चौथी वर्गामध्ये शिकत असताना श्रीकांत राठोड हे पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी येथे संजोग ढोले, प्रवीण ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नास्टिक शिकत होता त्यांचं संपूर्ण शिक्षण पुणे येथे झाले आहे.जिम्नास्टिक ह्या खेळामध्ये भारताला ऑलम्पिक मध्ये पदक मिळावं हे श्रीकांत राठोड त्यांचे स्वप्न आहेत,त्यासाठी ते सतत प्रयत्न करीत आहेत,एक न एक दिवस स्वप्न पूर्णत्वाकडे जाईल हे मात्र तितकेच खरे आहे.
0 Comments