मराठवाड्यातील बंजारा समाजाचा हैद्राबाद गॅजेट्स नुसार एसटी आरक्षणात समावेश करावा. बापूराव राठोड
परभणी:- नुकतेच महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजास मराठा कुणबी नुसार आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला याचा आधार घेत सामान्य हक्का नुसार त्याच हैदराबाद गॅझेट मध्ये मराठवाड्यातील बंजारा समाज हा अनुसूचित जमाती असा नोंद असलेला असल्यामुळे बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे कारण मराठवाडा हा विभाग निजाम राठोड राजवटीचा भाग असून याच निजाम राजवटीतील तेलंगाना व आंध्रप्रदेशातील बंजारा समाज आजही एसटी आरक्षणात आहे व तसे हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे ज्याप्रमाणे मराठा समाजाला न्याय शासनाने दिला त्याच पद्धतीने बंजारा समाजात सुद्धा न्याय द्यावा असे मत परभणी येथे आयोजित बंजारा समाज प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापुराव राठोड यांनी व्यक्त केले.यावेळी प्राचार्य बबनराव पवार ,वित्त लेखा अधिकारी संभाजीनगर उत्तम चव्हाण,लातूर मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, नायब तहसीलदार राजकुमार राठोड, दत्ता चव्हाण,डॉक्टर रमेश राठोड,डॉक्टर राहुल राठोड,कैलास चव्हाण,सुभाष पवार धनराज चव्हाण,आदी बंजारा बांधव उपस्थित होते.


0 Comments