Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मतदारसंघातील जनतेच्या सुख समाधानासाठी श्री गणरायाकडे आमदार संजय बनसोडे यांचे साकडे

मतदारसंघातील जनतेच्या सुख समाधानासाठी श्री गणरायाकडे आमदार संजय बनसोडे यांचे साकडे

महाराष्ट्र रत्न' हा माझा सन्मान नसून सर्व मतदार संघातील जनतेचा सन्मान आहे : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

*उदगीर* : शहरातील विविध गणेश मंडळातील गणेश भक्तांच्या आग्रहाखातर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी श्री गणेशाची मनोभावे आरती केली व मतदारसंघातील जनतेच्या सुख समाधानासाठी श्री गणरायाकडे  साकडे घातले.यावेळी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांचा विविध गणेश मंडळाच्या वतीने लंडन येथे 'महाराष्ट्र रत्न' पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.
 या सत्काराला उत्तर देताना आमदार संजय बनसोडे म्हणाले की,मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला. ही शक्ती केवळ आपल्या मतामुळे मिळाली. गेल्या १० वर्षात मी मतदार संघातील जनतेच्या सुख - सोईसाठी रात्रंदिवस काम केले आहे. त्याची दखल घेवुन मला लंडन येथे 'महाराष्ट्र रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा माझा सन्मान नसून सर्व मतदार संघातील जनतेचा सन्मान असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.ते उदगीर येथील विविध गणेश मंडळाच्या भेटी दरम्यान मंडळाकडून केलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मतदारसंघातील जनतेने दिलेल्या पाठबळामुळेच हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मला मिळाला असून आपल्या सत्कारामुळे मला पुन्हा काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे.  सदर पुरस्कार हा मी माझ्या जनतेला समर्पित करतो अशी भावनाही आ.बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे,प्रा.शाम डावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष मनोज पुदाले,भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकल्ले,माजी नगरसेवक विजय निटुरे, अनिल मुदाळे, अनिरुद्ध गुरुडे, गिरीश उप्परबावडे, ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, ज्ञानेश्वर पाटील रावणगावकर, प्रा.मल्लेश झुंगास्वामी, राजकुमार हुडगे, बबलू मुळे आदीसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात