*आपत्तीग्रस्त पशुपालकांना माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते धनादेश वाटप*
अतिवृष्टीमुळे उदगीर मतदार संघातील विविध गावातील पशुधन व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेक गावातील घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त भागाची पाहणी माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी करुन तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना देवुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे सांगितले होते. त्या अनुषगांने काल संग्राम बापूराव राजवाड खेर्डा ता.उदगीर यांच्या दोन म्हशी विज पडून मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यांना शासनाची मदत म्हणून ७५ हजाराचा धनादेश आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आला.
प्रशासनास उदगीर तालुक्यातील धडकनाळ, बोरगाव बु. सह आदी गावातील नुकसानग्रस्त भागांना पुढील आठवड्यापर्यंत अनुदान वाटप करण्याचे आदेश आ.संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
यावेळी बामणी, खेर्डा, कल्लुर, बनशेळकी, लोहारा, हंडरगुळी, हेर, वाढवणा, चांदेगाव ,
हाकनकवाडी, रावणगाव, हाळी, आदी गावातील आपत्तीग्रस्तांना थेट त्यांच्या खात्यावर रोख रक्कम जमा करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार राम बोरगावकर,
प्रा.श्याम डावळे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, ज्ञानेश्वर बिरादार येनकीकर, ज्ञानेश्वर पाटील रावणगावकर, बाळासाहेब मरलापल्ले यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.


0 Comments