Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर येथे आज राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

उदगीर येथे आज राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर, दि. 23  क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने 2023-24 वर्षातील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन उदगीर येथील पोस्ते पोदार लर्न स्कूल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते रविवार, 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी कळविले आहे.
राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यातील 8 विभागांमधून 14 वर्षाखालील 80 मुले व 80 मुली असे एकूण 160 स्पर्धक आणि त्यांच्या समवेत 16 संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. लकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात