प्रा.डॉ देवनाळे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्काराने सन्मानित.
उदगीर.महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत , ख्यातनाम वक्ते, फुले, शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि 1990 पासून सामाजिक कार्यात योगदान देणारे लातूर जिल्याचे सुपुत्र प्रा डॉ शिवाजीराव देवनाळे यांना जगतविख्यात साहियिक साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्याचे वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे,उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र रज्याचे समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सचिव सुमंत भांगे यांच्या हस्ते दिनांक 12 मार्च 2024 रोजी नॅशनल सेंटर फॉर पर्फार्मिंग आर्टस, जमशेद भाभा नाट्यगृह , एन सी पी ए मार्ग नरिमन पॉईंट मुंबई येथे प्रदान करण्यात आला. सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाच्या कार्यात मौलिक योगदान देणाऱ्या प्रा.डॉ देवनाळे सारख्या उच्च विद्याभूषित कार्यकर्त्याला न्याय मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील बहुजन समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


0 Comments