Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा सन 2023-24 च्या स्पर्धेत पुणे विभागाने मारली बाजी

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा सन 2023-24 च्या स्पर्धेत पुणे विभागाने मारली बाजी

उदगीर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर तालुका क्रीडा संकुल, उदगीर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी फायनल मुले व मुलींच्या १७ वर्षाखालील गटात विजेतेपदक पटकवीले. मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक पुणे विभाग, व्दितीय  क्रमांक कोल्हापूर व तृतिय क्रमांक मुंबई विभागाने पटकवून वर्चस्व राखले तर मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पुणे विभागाने, व्दितीय क्रमांक कोल्हापूर विभागाने तर तृतिय क्रमांक अमरावती विभागाने पटकवीला. स्पर्धेतील निवड झालेल्या मुलांची राष्ट्रीय स्पर्धा दि. 27 डिसेंबर 2023 ते 05 जोनवारी 2024 या कालावधीत  (अंदमान व निकोबार) आणि मुलींची स्पर्धा दि. 25 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत बिहार  येथे होणा-या राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड करण्यात येणार आहे.
उदगीर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिलीप भागवत, उदगीर नगर पालीकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रमण रेड्डी, डॉ.आशीष पाटील, डॉ.डांगे,  माजी नगरसेवक, फैयाझ शेख, अहमद सरवर, अहमद रफेदार, सलीम परकोटे, परवेज कादरी,  यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, सारिका काळे, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, राज्य क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे, चंद्रकांत लोदगेकर, अभिजीत मोरे, अमर मगर, स्वप्नील मुळे, आदी मान्यवर उपस्थित होते.  
स्पर्धेतील विजेत्या प्रथम , द्वितीय संघांना हॉनेस्ट ग्रुप या ग्रुप तर्फे ट्रॉफी देण्यात आले. व हॉनेस्ट ग्रुपचे इफतेखार शेख यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य करणाऱ्या लातूर फुटबॉल असेासिएशन तर्फे अध्यक्ष निजामोद्दीन शेख यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी जगन्नाथ लकडे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेस सहकार्य केल्याबद्दल उदगीर येथील पत्रकार बंधु फुटबॉलचे पदाधिकारी तालुका प्रशासन, व उदगीरच्या नागरीकांचे या सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच माजी नगरसेवक फैयाज शेख यांनी आपले मनेागत व्यकत करून मा.ना.श्री.संजयजी बनसोडे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांनी या स्पर्धा उदगीर येथे आयोजन दिले म्हणून आभार मानले तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने या स्पर्धेचे उत्तम आयेाजन नियोजन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आले. 


 निकाल खालीलप्रमाणे
1७ वर्षाखालील मुलेः-  
प्रथम क्रमांक - पुणे विभाग,

द्वितीय क्रमांक - कोल्हापूर विभाग,

तृतीय क्रमांक - मुंबई विभाग

1७ वर्षाखालील मुली: -
प्रथम क्रमांक - पुणे विभाग,

द्वितीय क्रमांक - कोल्हापूर विभाग,

तृतीय क्रमांक - अमरावती विभाग

Post a Comment

0 Comments

जाहिरात