Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा आरोग्य समन्वयक पदी संपादक गणेश मुंडे यांची निवड.

व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा आरोग्य समन्वयक पदी संपादक गणेश मुंडे यांची निवड.

 उदगीर प्रतिनिधी:- गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व आपल्या सामाजिक कार्यातून अनेकांना वैद्यकीय शासकीय कामाच्या माध्यमातून मदत करणारे युवा पत्रकार तथा उदयगिरी दृष्टी न्यूज चे संपादक गणेश मुंडे यांची ओळख आहे अनेक नामांकित वर्तमानपत्रांमध्ये प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले आहे हे काम करत असताना अधिकारी व नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधून अनेक प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.अशा धडपडी व सर्वांशी संपर्क असलेल्या युवा पत्रकार च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा सर्व पत्रकार बांधवांपर्यंत पोहोचावी यासाठी व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी लातूर येथे झालेल्या वैद्यकीय शिबिरामध्ये विधानपरिषदेचेआमदार रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.हे नियुक्तीपत्र व्हाईस ऑफ मीडिया आणि एमआयएमएसआर व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत लातूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या
महाआरोग्य शिबीर व आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वितरण या कार्यक्रमात देण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आ. रमेशअप्पा कराड विधान परिषद सदस्य,तथा कार्यकारी संचालक एमआयएमएसआर,लातूर तर प्रमुख 
प्रमुख पाहुणे-डॉ.एन.पी.जमादार अधिष्ठाता,यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर,संदीप काळे संस्थापक अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया,दिव्या भोसले राष्ट्रीय महासचिव,विजय चोरडिया मराठवाडा अध्यक्ष,बालाजी फड, मराठवाडा संपर्क प्रमुख,संगम कोटलवार जिल्हाध्यक्ष,निशांत भद्रेश्वर,अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स विंग विष्णु अष्टेकर,अध्यक्ष,साप्ताहिक विंग डॉ.सितम सोनवणे,अध्यक्ष, डिजिटल मिडिया यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष प्रभाकर शिरूरे, (लातूर), रविकांत क्षेत्रपाळे, (अहमदपूर), बिठ्ठल कटके, (रेणापूर), बिनोद निला, (चाकुर), परमेश्टार शिंदे, (निलंगा, बिजया बिराजदार, (औसा), प्रा. रेवण मळभागे, (देवणी), अॅड.अमोल कळशे, (जळकोट) यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments

जाहिरात