*क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुंबई ते बिदर रेल्वेला नविन तीन डब्बे जोडले*
*केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे ना.बनसोडे यांनी मानले आभार*
*उदगीर* : लातूर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई ते बिदर ही रेल्वे मुंबईला जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने मुंबई ते बिदर व बिदर ते मुंबई या रेल्वेला नेहमीच गर्दी असते तर अनेक वेळा तिकिटासाठी वेटिंग लिस्ट असल्याकारणामुळे अनेकांना या रेल्वेने प्रवास करता येत नव्हता सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव व रेल्वेचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी केली होती ना.संजय बनसोडे यांच्या या मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी त्यांचे खाजगी सचिव वेदप्रकाश यांना निर्देश देवून मुंबई ते बिदर व बिदर ते मुंबई या रेल्वेसाठी प्रथम श्रेणी वातानुकुलीत ए.सी. द्वितीय श्रेणी ए.सी. व शयनयान (स्लिपर) कक्ष असे नविन तीन नविन डब्बे जोडले असुन आता बिदर, उदगीर सह लातूर जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय दुर होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगून आपल्या भागातील या रेल्वेला नविन तीन डब्बे जोडल्याने केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
बिदर ते मुंबई रेल्वेला नविन ३ डब्बे जोडल्याने नागरिकांची होणारी गैरसोय थांबणार असुन आता मुंबई ते लातूर, बिदर प्रवास हा सुखकर व आरामदायी होणार असल्याने या भागातील नागरिकांसह व्यापारी वर्गातून क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले जात आहेत.
0 Comments