सखा क्रीडा मंडळ च्या वतीने राज्य क्रीडा दिन निमित्त जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा
उदगीर:सखा क्रीडा मंडळच्या वतीने ऑलंपिक खेळातील व्यक्तीक क्रीडा प्रकारात स्वातंत्र्य भारतातील सर्वप्रथम पदक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची जयंती व पहिले महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन निमित्त द्वितीय सखा कप खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली..
जिल्ह्यातून पहिल्यांदाच , १६४ खेळाडूंनी स्पर्धेसाठी हजेरी लावली स्पर्धेमध्ये कॉड व इनलाईन प्रकार होते. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे डॉ नितीन गुरूडे, डॉ चिकमुर्गे, प्रशांत जगताप, सौ गुरूडे मॉडम, सौ चिकमुर्गे मॉडम, सखा क्रीडा मंडळ चे संस्थापक / अध्यक्ष तथा राष्ट्रीय पंच संदीप स. पवार, सचिव सिकंदर आडे, यांनी उद्घाटन करून स्पर्धेस प्रारंभ केला. स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला आणि स्पर्धेसाठी तांत्रिक नियोजन झिशान शेख , संकेत सोनटक्के, यांनी केले व स्पर्धा पार पाडली.
0 Comments