*उदगीर शहरात मराठा भवन बांधकामासाठी १० कोटी रुपयाचा निधी मंजुर*
*ना.संजय बनसोडे यांनी मराठा बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला*
*उदगीर :* मतदारसंघातील उदगीर व जळकोट तालुक्यात व परिसरात मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. मराठा समाजाच्या वतीने आयोजित सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी तसेच प्रशासकीय कामे, गरजु विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, अभ्यासाची सोय व ग्रामीण भागातील नागरीकांच्या व्यवस्थेसाठी एक सुसज्ज वास्तुची आवश्यकता असल्याने उदगीर शहरात मराठा भवन बांधकाम करण्यासाठी 'वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन'
१० कोटी रुपयाचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना.संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर - जळकोट मतदार संघात मराठा समाजबांधव व विद्यार्थांची संख्या लक्षात घेवुन या भागातील समाजबांधवांनी ना.संजय बनसोडे यांच्याकडे 'मराठा भवन' उभारावे अशी मागणी केली असता ना.संजय बनसोडे यांनी मराठा बांधवांना मराठा भवनाच्या निमिर्तीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देवु असे वचन दिले होते. ती वचनपूर्ती आज करुन उदगीर शहरातील मराठा भवन बांधकामासाठी १० कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याने मतदार संघातील मराठा समाज बांधवांकडुन ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले जात आहेत.
उदगीर मतदार संघाच्या विकासाचा रथ अविरत पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस ना.संजय बनसोडे हे काम करत असुन विविध योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी शासन दरबारी पाठपुरावा करुन तो मतदार संघात खेचुन आणुन लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात उदगीर मतदार संघाच्या विकासाचा नवा 'उदगीर पॅटर्न' ना.बनसोडे यांनी निर्माण केल्याने त्यांचे मतदार संघातील जनतेनी कौतुक करुन आभार व्यक्त केले आहेत. मी केवळ जनतेचे सेवक म्हणून जाहिरपणे सांगुन दर आठवड्याला सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवून प्रत्येकाच्या सुख - दु:खात ते धावुन जातात. रस्त्यात कुठेही थांबुन सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणारे महाराष्ट्रातील ते एकमेव मंत्री असावेत सतत जनतेच्या कामात मग्न राहून मतदार संघात वेळ दिल्यानंतर मंत्री म्हणून मंत्रालयातही ते सकाळी १० ते रात्री उशिरा पर्यंत राज्यभरातुन येणा-या सर्व लोकप्रतिनिधीसह नागरिकांच्या अडचणी सोडवत असतात हे ना.बनसोडे यांचे वैशिष्टय आहे.


0 Comments