तुरीच्या कडप्यावरून करखेली येथे मारहाण, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उदगीर:तालुक्यातील करखेली येथे तुरीचा कडपा का घेवून गेलास म्हणून एकास मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की करखेली येथे फिर्यादीने तुरीचा कडप्या का घेऊन गेलास असे विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीस तू कोण विचारणार म्हणून शिवीगाळ करून चापटाने माझ्या डाव्या गालावर मारहाण केली, व त्याच्या हातातील कत्तीच्या बोथड बाजूने डाव्या पायाच्या नळीवर मारून दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद तुकाराम धोंडिबा शिंदे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी विजयकुमार धोंडिबा शिंदे यांच्यावर गुरंन 16/24 कलम 324,323,504,506 भादवी प्रमाणे 5 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल केंद्रे हे करीत आहेत.


0 Comments