Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

शीतल जलतरण तलाव मालकांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शीतल जलतरण तलाव मालकांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उदगीर:शहरातील रिंग रोड पांढरे मंगल कार्यालया जवळ असलेल्या शीतल जलतरण तलावात १७ एप्रिल रोज बुधवारी १ वाजेच्या दरम्यान मयुरेश विजयकुमार राठोड वय १५ वर्ष या शाळकरी मुलांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याने जलतरण तलावांच्या मालकांवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयुरेश विजयकुमार राठोड हा मुलगा १७ एप्रिल रोजी शीतल जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता, जलतरण तलावांच्या मालकांनी स्विमिंग पूल मध्ये पाण्याची पातळी दर्शविण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने व जीवरक्षक न ठेवता हायगायी व निष्काळजीपणा केल्याने  पोहण्यासाठी गेलेला मयुरेश विजयकुमार राठोड या मुलांना पाण्याच्या पातळीचा अंदाज न लागल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला,विजयकुमार गोविंद राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवशंकर प्रभूअप्पा चिल्लरगे,शिवकुमार रमेश चाकूरे यांच्यावर गुरंन २१४/२४ कलम ३०४ (अ ) भादवी प्रमाणे १८ एप्रिल रोज गुरुवारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक भिसे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात