खाजगी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करा: उच्च न्यायालय.
खाजगी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करन्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सदर प्रकरणी थोडक्यात माहिती अशी की, याचिककर्ती कविता बांगर खाजगी आश्रम शाळेत कार्यरत आहेत, अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्या बाबत मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी विविध निकलाद्वारे निर्देश दिले असताना शासनाचे धोरण नाही असे कारण देऊन सदर कर्मचाऱ्याचा प्रस्ताव परत करण्यात आला. सदर नाराजीने याचिककर्ती यांनी ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फ़त रिट याचिका दाखल केली. सुनावणी अंती मा. उच्च न्यायालयाने याचिका मंजूर करून याचिककर्ती यांना वरीष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावे असे निर्देश दिले. सदर प्रकरणी ऍड अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले.
0 Comments