Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*समाजाला दिशा देण्याचे काम संताच्या वाणीतून होते : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे*

*समाजाला दिशा देण्याचे काम संताच्या वाणीतून होते : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे*

*विश्वाला शांती मिळावी म्हणून उदगीर शहरात यज्ञ सोहळा*

*उदगीर* : आपण सर्वांनी जीवन जगत असताना नेहमी आशावादी व प्रयत्नवादी राहिले पाहिजे. आध्यात्मिकतेमुळे आपणास ऊर्जा मिळते म्हणून आपल्या जीवनाची यशस्वीतेकडे वाटचाल होते आपण सर्वजन संताच्या विचारावर चालणारे नागरीक आहोत संतानी दिलेल्या उपदेशाचे पालन आपण दैनंदिन जीवन करत असतो. संताच्या वाणीने पिढी समृध्द होवुन समाजाला दिशा देण्याचे काम संताच्या वाणीतून होत असते असे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते श्री सदगुरु हावगीस्वामी शेतमळा, नांदेड बिदर रोड, उदगीर येथे आयोजीत श्री सदगुरु हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण व अखंड शिवनाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी काशीपीठ वाराणसीचे जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी,
डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, म.नि.प्र.सिध्दलिंग महास्वामीजी, नीळकंठ शिवाचार्य महाराज, सिध्दओमकार शिवाचार्य महाराज, शंभुलिंग शिवाचार्ज महाराज अंबाजोगाई, संगनबस्व महास्वामीजी निलंगा, श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागनसुर,
माजी आ.गोविंदराव केंद्रे,  लक्ष्मीबाई पांढरे, नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, चाकुरचे नगराध्यक्ष कपिल माकणे, रामराव बिरादार, सुधीर भोसले, अॅड. दत्ता पाटील, शि.भ.प. उध्दव महाराज हैबतपुरे गुरुजी, अनिता हैबतपुरे, विमलबाई गर्जे, रेखा कानमंदे, सुभाष धनुरे, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, प्रा.श्याम डावळे, बाबुराव पांढरे,  फकीर हाशमी, विरभद्र महाराज सताळकर, साधु लोणीकर, सरस्वती हलबुर्गे, वनमाला कप्ते, मीना हालकुडे, अनिता हलकुडे, सुनिता कड्डे, छाया स्वामी, जयश्री खेळगे, श्रीदेवी पांढरे, उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, माणूस म्हणून आपण सर्वजन एकच आहोत आपण सर्वजन धार्मिक कार्यक्रमाला महत्व देतो म्हणून आपल्याकडे संतांची प्रवचने होतात त्या साधुंच्या प्रवचानातुन लोकजागृती होते व संतांच्या शिकवणीमुळेच आपल्या जीवनाला दिशा मिळते. उदगीर शहरातील सुवर्ण कलशारोहण हा क्षण श्री गुरु हावगीस्वामी मठाच्या इतिहासातील सुवर्ण क्षण असुन
श्री हावगी मठ हे उदगीरचे दैवत आहे. आज
श्रध्देने ही नगरी सजली असुन सांप्रदायिक विचार पुढच्या पिढीला मिळावे यासाठी संत प्रयत्न करत असतात, याच परिसरात आपण लिंगायत भवनची निर्मीती केली.
विविध विकासकामामुळे उदगीरच्या वैभवात भर पडली आहे.
गेल्या ६ दिवसापासून अखंड शिवनाम सप्ताह ५०५१ सदभक्तांचा भव्य ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा या परिसरात आयोजीत केल्याने धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. आज महाराजांच्या दर्शनाने ऊर्जा मिळाली. संताची सेवा केली तर संत कृपा होते. या कार्यक्रमामुळे मतदार संघ पुण्यवान झाला असून शहरातील समाजाबांधवांची भावना लक्षात घेवुन तब्बल ७ कोटी ५० लक्ष रुपयाचे लिंगायत भवन उभारले आहे. श्री
गुरु हावगीस्वामी मठ आपले ऊर्जास्थान आहे. 
मठाचा जीर्णोद्धार करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मठाच्या कामासाठी दिला तर चौकी मठासाठी १ कोटी रु. , लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीसाठी एकूण ७० लक्ष रु दिले. सांप्रदायिक वारकरी संस्कार भवनाच्या निर्मितीसाठी २ कोटी रु. जळकोट येथे लिंगायत भवन दिले तर जळकोट शहरात  महात्मा बस्वेश्वर महाराजांचा भव्य - दिव्य पुतळा उभारण्याचे काम केले हे केवळ
तुमचे आशिर्वाद व प्रेमामुळे यापुढे ही माझ्यावर आपला विश्वास असाच ठेवा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शि.भ.प. शिवराज नावंदे गुरुजी यांनी केले. सुत्रसंचलन विरभद्र स्वामी यांनी केले. यावेळी हजारो भाविक - भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात