एसटी बस मध्ये चढताना चोरट्याने खिशा कापूस ४७ हजार ५०० रुपये केले लंपास
उदगीर:येथिल बस्थानक येथे एसटी बस मध्ये चढताना चोरट्याने एकाचा खिसा कापून ४७ हजार ५०० रुपये लंपास केल्याची घटना १६ मे रोजी तीन वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात १८ मे रोज शनिवारी अज्ञात चोरट्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उत्तम गोविंदराव गुणाले वय ६६ वर्ष सेवानिवृत्त शिक्षक राहणार हरकरे नगर ह.मु. चिमाचीवाडी ता. उदगीर हे १६ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उदगीर बस्थानक येथे एसटी बस मध्ये चढत असताना चोर खिशात ठेवलेले ४७ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्याने खिसा कापून लंपास केले आहे.उत्तम गोविंदराव गुणाले यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुरंन १३६/२४ कलम ३७९ भादवी प्रमाणे १८ मे रोज शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जयराम पुठेवाड हे करीत आहेत.
0 Comments