Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मुक्तीसंग्रामाचा लढा सामान्य माणसांच्या हक्काचा,धनंजय गुडसूरकर

मुक्तीसंग्रामाचा लढा  सामान्य माणसांच्या हक्काचा,धनंजय गुडसूरकर

मुक्तीसंग्रामानिमित तहसीलच्या  उपक्रमास प्रतिसाद

उदगीर( वार्ताहर)
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा केवळ स्वातंत्र्याचा नव्हता तर तो सामान्य माणसांच्या हक्काचाही होता" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य व मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक धनंजय गुडसूरकर यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त उदगीर तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी तहसीलदार रामेश्वर गोरे होते .व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी वाघमारे ,तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. प्रशांत कापसे, गटशिक्षणाधिकारी शेख नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर शाखा अभियंता देवकर आदी उपस्थित होते . मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उदगीर तहसील कार्यालयाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम वरील ग्रंथाचे व चित्रांचे प्रदर्शन व आरोग्य शिबीर विविध गुणदर्शनाचा  कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन राधेकृष्ण मंगल कार्यालय देगलूर रोड येथे आयोजित करण्यात आले होते . ग्रंथ प्रदर्शनाचे   उद्घाटन तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेत राष्ट्रीय गीतावरील नृत्य नाटिका व विविध कलागुणाचे सादरीकरण केले . रक्तदान शिबिरामध्ये वीस रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता .तसेच शासकीय निमशासकीय कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ तिरुके ,तुकाराम चामले , डोईजोडे यांच्यासह वीर पत्नी काळे निर्मलाबाई, शिंदे चंद्रकलाबाई यांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या परिवाराचा  या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . सांस्कृतिक स्पर्धेतील विद्यार्थी यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले अध्यक्षीय समारोपात तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व घटकाचे मनःपूर्वक कौतुक केले या माध्यमातून मुक्ती संग्रामाचा इतिहास पुन्हा एकदा जागृत झाल्याचे तहसीलदार गोरे यांनी . तसेच तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक  मोठ्या संख्येने उपस्थित . दत्ता मोरे, बालाजी धमनसुरे,  ज्ञानोबा मुंढे यांनी सुत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळ अधिकारी गणेश हिवरे, शंकर जाधव पंडित जाधव संतोष चव्हाण तलाठी  अमोल रामशेट्टे  पंकज कांबळे   तानाजी शिंदे देवप्रिय पवार बाबासाहेव कांबळे आदींनी पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात