Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा रोडच्या मध्यभागी बसवा या मागणीसाठी उदगीर नगरपालिका समोर धरणे आंदोलन.

भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा रोडच्या मध्यभागी बसवा या मागणीसाठी उदगीर नगरपालिका समोर  धरणे आंदोलन.
 
उदगीर दिनांक ६.९.२०३ वार बुधवार रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती  समिती  च्या वतीने उदगीर नगरपालिकेच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रोडच्या मध्यभागी बसवून चौक विकसित करण्यात यावा या मागणीसाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. उदगीर नगरपालिकेने घेतलेल्या ठरावाप्रमाणे सदरील पुतळा हा रोडच्या मध्यभागी बसवण्यात यावा. इतर महामानवांचे पुतळी रोडच्या मध्यभागी आहेत त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रोडच्या मध्यभागी बसवून चौक विकसित करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. हलगी वाजून  जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले. निवेदन घेण्यासाठी मुख्याधिकारी खाली येत नसल्यामुळे यावेळी मुख्याधिकारी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीचे निमंत्रक पूज्य भदंत  नागसेन बोधी, प्रा. डॉ. शिवाजी मुळे माजी नगरसेवक गजानन सताळकर, मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकुर्केकर , उषाताई कांबळे, दिलीप कांबळे, सुरेश पाटील नेत्र गावकर,  मौलाना नौशाद, सनाउल्ला खान, पप्पू गायकवाड,निवृत्ती सांगवे, राजकिरण शिंदे,बापूसाहेब कांबळे, अजित शिंदे, संभाजी भाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या धरणे आंदोलनात अशोक कांबळे, माजी नगरसेवक साबेर पटेल   प्रीतम सूर्यवंशी, माधव उदगीरकर, राहुल सोनवणे, सचिन जाधव, राजू दावणगावकर, अण्णासाहेब बनशेळकीकर, अरुण उजेडकर, प्रेम गायकवाड, शिवाजी पकोळे, मझहर पटेल, विश्वनाथ गायकवाड.इत्यादी सर्वपक्षीय सर्व धर्मीय कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांनी या धरणे  आंदोलनात सहभाग नोंदवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा रोडच्या मध्यभागी बसवण्यासाठी पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात