Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त मुक्ती लढ्यातील घटनांच्या छायाचित्रांचे उदगीरमध्ये प्रदर्शन,

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त मुक्ती लढ्यातील घटनांच्या छायाचित्रांचे उदगीरमध्ये प्रदर्शन,

लातूर: मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम  जिल्ह्यात सुरु आहेत. उदगीर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील महत्वाच्या घटनांवर आधारित छायाचित्र, वृत्तपत्र आणि ग्रंथ प्रदर्शन उदगीर तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते झाले. 
यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे उपस्थित होते. हे प्रदर्शन प्रा. सुनील पुरी यांच्या सहकार्याने भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम ग्रंथ, त्या काळातील घटनाचे फोटो पोस्टर, त्याकाळातील वृत्तपत्र प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन याबरोबर आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर, स्वांतत्र्य सैनिक व कलावंत गुणवंत विद्यार्थीचा सत्कार, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी जनतेला खुले करण्यात आले. अनेकांनी हे महत्वाचे प्रदर्शन पाहिले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात