सामाजिक वणीकरण कार्यालयाच्या रोपवाटीकेच नेमक गूढ काय?
उदगीर:एम आर ई जी एस अंतर्गत सन २०२२/२३ मध्य मंजूर झालेली रोपवाटिकेची लागवड संपत आली पण बहादूर फिल्ड अधिकारी ( वनपाल )परशुराम पवार यांनी पदाची गुर्मी दाखवत रोप वाटिका पूर्ण पणे शून्यात ठेवली आहे. रोजगार सेवक हे ग्रामपंचायत निडेबन येथे कार्यरत असून सुद्धा ग्रामरोजगार सेवकाचे काम हे वनपाल अधिकारी पवार यांनी केले. गेली आठ दिवसापासून त्यांचे बोगस काम उघडकीस आल्याने वनपाल अधिकारी पवार यांनी रोपवाटिकेचे काम ग्रामरोजगार सेवक यांना आता हे काम तुमचे आहे म्हणत, रोजगाराची बिले ही मस्टर प्रमाणे काढण्यास सांगितले असल्याचे ग्रामरोजगार सेवक माध्यमासमोर बोलताना सांगितले. वनपाल पवार यांना बोलण्याची तमीज सुद्धा राहिलेली नाही पैश्याच्या पुढे त्यांना समोरील व्यक्ती कोण आहे असा मुजोरी माज या वनपाल पवारांना चढलेला दिसुन् येत आहे मुजोर वनपाल पवार हे आपल्या वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून हे काम करित आहे अशीही चर्चा जोरात सुरू झाली आहे.
मजूर महिलांना कायम सेवेत सामावून घेतो असे आश्वासन देऊन पूर्ण रोप वाटिकेतील महिलांना रोड दुतर्फा याठिकाणी कामावर रोपे लावणे व खड्ड्याचे आळे करणे असे कामे करून घेत असून आलेले रोड दुतर्फा ची बिले परशुराम पवार यांनी बीड जिल्ह्यातील नातेवाईक व इतर ठिकाणी असलेल्या नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करून बीले उचलून हडप करणे असे काम वनपाल पवार हे करित असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.
0 Comments