Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मंथन पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी

मंथन पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी

उदगीर / प्रतिनिधी : 
उदगीर:शिव समर्थ शिक्षण प्रसारक डोंगरशेळकी संचलित येथील विकास नगर मधील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या मंथन पब्लिक स्कूलमध्ये गोकुळाष्टमी निमित दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वरराव निटूरे हे होते.तर यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे माजी उपसभापती रामराव मामा बिरादार, पं.स.उदगीरचे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, चंदर अण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील,  केंद्रप्रमुख बी.के.धमनसुरे, शाळेचे संचालक सोमनाथ अंकुशे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सुवर्णा पटवारी यांनी मांडले.त्यानंतर सुरेखा गुजलवार , राजेश्वरराव निटूरे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत बालकांचे कौतुक केले. त्यानंतर सहशिक्षिका आस्मा सय्यद यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश्वरजी  निटुरे यांच्या हस्ते आदर्श शिक्षीका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालकांची राधा कृष्णाची वेशभूषा लक्षणीय ठरली. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शुभांगी साळुंके यांनी केले तर सोनाली अंकुशे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभांगी मॅडम, अंकुशे मॅडम, आस्मा मॅडम,रेखा मॅडम, प्रणिता मॅडम,सुनीता मॅडम, भाग्यश्री मावशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments

जाहिरात