Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

तालुक्यातील रोपवाटिकेच्या कामावर बोगस मजूर, अधिकाऱ्यांनी उचलले मजुरांचे पैसे,अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषण करणार

तालुक्यातील रोपवाटिकेच्या कामावर बोगस मजूर, अधिकाऱ्यांनी उचलले मजुरांचे पैसे,अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषण करणार

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:तालुक्यातील अवलकोंडा,लोणी,हकनकवाडी येथील रोपवाटिकेच्या नावाखाली मजुरांची बोगस नावे लावून वनरक्षक अधिकारी वटपलवाड यांनी ग्राम रोजगार सेवकांस हाताशी धरून मजुरांची लाखो रुपयांची रक्कम उचलून शासनाला चुना लावणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे,अवलकोंडा,लोणी,हकनकवाडी रोपवाटिकेवर मजूर नसताना कुठल्यातरी मजुरांना रोपवाटिकेवर उभे करून फोटो काढून रोपवाटिकेवर मजूर असल्याचे शासनाला दाखवून मजुरांच्या नावे आलेली रक्कम हडप करण्यात आली, वनरक्षक अधिकारी वटपलवाड यांनी या कामात गेली पाच ते सहा महिन्यांपासून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून,वनरक्षक अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे अन्यथा अहमदपूर येथील वनविभाग कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी पत्रकार सुधाकर नाईक,व पत्रकार संग्राम पवार यांनी तहसीलदार रामेश्वर गोरे,वनमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,जिल्हाधिकारी लातूर,विभागीय वनविभाग कार्यालय धाराशिव, विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात