Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

आझाद मैदानावरील अंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा- बाबासाहेब वाघमारे.

आझाद मैदानावरील अंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा- बाबासाहेब वाघमारे.

उदगीर येथील जिल्हा मेळाव्यात शिक्षकांचा निर्धार.              

उदगीर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या हक्काच्या वेतनासाठी शिक्षक समन्वय संघाने पुकारलेल्या महाएल्गार आंदोलनास दिनांक ३० आक्टोबर पासून मुंबईत आझाद मैदानावर सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने उदगीर येथील संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर येथे जिल्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी घेतलेल्या शिक्षक जागर मेळाव्यात आझाद मैदानावरील अंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला असून या आंदोलनात यशस्वी झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही असा निश्चय केला आहे.
       यावेळी उपस्थित शिक्षकांना अंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक बाबासाहेब वाघमारे,राम पेद्दावाड, समियोद्दिन काझी, अर्जुन मुंडे आदींनी केले.या शिक्षक जागर मेळाव्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिनकर निकम  तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक आर.व्हि.गुट्टे, दत्तात्रय येरणाळे,कराड रमेश, हनुमंत जाधव होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन उगीले यांनी तर आभार सुनील गिरी यांनी मानले या जागर मेळाव्यास लातूर जिल्ह्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी जामणे, भानुदास चव्हाण, कपिल वट्टमवार, कांचन केंद्रे,भागवत पेठे, दत्ता देशमुख, संदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात