निष्ठा ,प्रमाणिकपणा व कष्ट माणसाला ध्येयापर्यंत घेऊन जातात -पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम
उदगीर ,निष्ठा प्रामाणिकपणा व कष्ट माणसाला यशापर्यंत घेऊन जात असतात त्यामुळे जीवनात विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग असतात त्यामुळे सकारात्मक दृष्टीने समायोजन साधत क्षमतेला कष्टाची जोड द्यावे व आपल्या क्षमताचे संधीत रूपांतर करावे असे प्रतिपादन उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केले ते सि-डॅक कम्प्युटर्स आयोजित छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण ( सारथी ) व MS-CIT च्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे सर व मातृभूमी महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज गुरुडे सर हे होते पुढे बोलताना पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम म्हणाले व्यक्तीने जीवनात मोठा विचार करणे महत्त्वाचे असून अल्पसंतुष्ट व्यक्ती मोठे ध्येय गाठू शकत नाहीत तसेच सोशल मीडिया हे शस्त्रासारखे असून त्याचा वापर योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे व्हायरल मेसेज बद्दल गाभिर्यता बाळगले पाहिजे. यावेळी सारथी या या संस्थेचे कार्य 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेच्या माध्यमातून व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचल्याबद्दल पोहोचल्याबद्दल सुमित पाटील, ऋतुजा भंडे व शिवाजी वाकळे यांना सारथीच्या वतीने दिलेल्या रोख रकमेचे बक्षीस मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात आले. त्याच बरोबर MS -CIT मध्ये जुलै २०२३ बॅचमध्ये 100 पैकी 100 गुण घेऊन पहिले आलेले 05 विध्यार्थी आयनिले अभिषेक, माने सौरभ, चिमनदरे योगेश, सोनटक्के मयुरी, भोसले अंकिता, 100 पैकी 99 गुण घेऊन दुसरे आलेले 07 विध्यार्थी साखरे शशिकांत, कुलकर्णी पार्थ, सोलव रितेश, मयंक हवा, कांबळे निर्जला, पायवाडे मारीया, भिंगे अंकिता, 100 पैकी 98 गुण घेऊन तिसरे आलेले 08 विध्यार्थी मठपती भीमाशंकर, दायमी फारिया, उस्ताद जोहा, मुसळे पद्मश्री, कांबळे प्रियंका, केंद्रे संचिता, सूर्यवंशी प्रशिक, गडीकर सारिका, कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य मनोज गुरुडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा जाई शर्मा यांनी केले तर आभार प्रा बिभीषण मद्देवाड यांनी मांनले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा सय्यद उस्ताद, प्रा राजेश चटलावार, प्रा मोरे, उषा साताळकर, अन्वेष हिपळगावकर, ओंकारे जगदीशा, मुबारक पटेल, देवा डोंगरे, दयानंद टाके, विवेक देवर्षे, संगिता दुंडे, कांबळे प्रियंका, प्रा उषा कुलकर्णी, आदींनी परिश्रम केले यावेळी सी-डँक कंप्युटर्स व सारथीचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments