Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उडान पुलावर कारचालकाने लुना स्वाराला उडविले,लुनास्वार ठार

उडान पुलावर कारचालकाने लुना स्वाराला उडविले,लुनास्वार ठार

उदगीर:येथील एसटी कॉलनी नळेगावं रोडवरील उडान पुलावर कारचालकाने लुना स्वारास उडविल्याची घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की. उदगीर शहरातील नळेगावं रोडवरील उडान पुलावर कार क्रमांक एम.एच.26 बी.सी.6050 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने हयगायीने व निष्काळजीपणाने चालवून लुना क्रमांक एम.एच.24 बि.बी.4091या लुनाला ब्रीजवर समोरून जोराची धडक दिली.या अपघातात लुनास्वार रहीम फरीद शेख राहणार येणकी ता उदगीर ह.मु.औरंगपूरा उदगीर हे जखमी झाले.त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी जखमीची तपासणी करून मृत घोषित केले.मायताचे भाऊ इस्माईल फरीद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकांवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन 623/23 कलम 304 (अ) 279 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात