मादलापूर शिवारात एका ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू,पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
उदगीर:तालुक्यातील मादलापूर शिवारात एका ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याप्रकणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की.मादलापूर येथील सुभाष मारोती बिरादार वय ७२ वर्ष हा वृद्ध व्यक्ती डोक्यावर परिणाम झाल्याने व आजारी असल्यामुळे घरातून २२ ऑक्टोबर रोजी निघून गेला होता.याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत २५ ऑक्टोबर रोजी ४५/२३ प्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आली होती.२६ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास हनुमंत नरसिंग शिंदे यांच्या शेतात सुभाष मारोती बिरादार यांचा मृतदेह आढळून आला.असी माहिती शिवराज सुभाष बिरादार यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नंबर ७४/२३ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे २६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेडकन्स्टेबल पडिले हे करीत आहेत.
0 Comments