Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी : तहसीलदार रामेश्वर गोरे

वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी :  तहसीलदार रामेश्वर गोरे
शिवाजी महाविद्यालय व ग्राम पंचायत बामणी तर्फे 101 वृक्षांची लागवड


उदगीर:मराठवाड्यामध्ये वृक्षांचे प्रमाण हे अतिशय कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड ही आपल्या प्रदेशाची व एकूणच काळाची गरज बनलेली आहे. ही गरज ओळखून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे. तसेच वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे. शिवाजी महाविद्यालय उदगीरचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कार्यालय बामणी तर्फे वृक्ष लागवडीचे हे अतिशय उत्कृष्ट कार्य हाती घेण्यात आले आहे. प्रशासन सुद्धा या कार्याच्या पाठीशी राहील, असे मत उदगीरचे तहसीलदार मा. रामेश्वर गोरे यांनी व्यक्त केले. ते शिवाजी महाविद्यालय, उदगीर व ग्रामपंचायत  बामणीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरविंद नवले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे लातूर जिल्हा समन्वयक डॉ. केशव अलगुले, उदगीर येथील तृतीयपंथीयांच्या गुरु अंजली पटेल, ग्रीन बामणीचे सर्वेसर्वा राजकुमार बिराजदार, सरपंच सौ. प्रभावती बिराजदार, शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे इत्यादींची उपस्थिती होती.
         पुढे बोलताना श्री गोरे यांनी रसेयोच्या वृक्ष दान दत्तक अभियानाचे व ग्रामपंचायत बामणीच्या वतीने करण्यात येत असलेल्या वृक्ष लागवडीचे कौतुक केले. डॉ. अलगुले यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना वृक्षांचे महत्व विषय केले. आज आपण वृक्ष लागवडीकडे लक्ष्य दिले नाही तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना दप्तरासोबत ऑक्षिजन सिलेंडर सुद्धा घ्यावा लागेल. राजकुमार बिराजदार यांनी ग्रीन बामणी उपक्रमाची माहिती सर्वांना दिली शिवाजी महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले.अध्यक्ष समारोपाप्रसंगी डॉ. नवले यांनी बामणी हे गाव येणाऱ्या काळात एक आदर्श गाव होइल असे मत व्यक्त केले.
         याप्रसंगी शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वृक्ष दान दत्तक अभियानाच्या अंतर्गत पिंपळ, वड, महागणी, जांभूळ, रामफळ, नारळ अशा 101 वृक्षांची लागवड करण्यात आली.तसेच हनुमंत देवराई येथे दोन सिमेंटचे बाक बसवण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. बालाजी सूर्यवंशी, डॉ. अनंत टेकाळे, डॉ. सुरेश शिंदे, बाळासाहेब बिराजदार, विद्यार्थी व ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आले. प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे संचलन तर डॉ. सुरेश शिंदे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रबंधक बालाजी पाटील, डॉ. संजय निटुरे, प्रा. रंजन यडतकर, काशिनाथ बिराजदार, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात