पोळ्या दिवशी तळ्यात बैल धुताना तरुण बुडाला,चोंडी येथील घटना,दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
उदगीर तालुक्यातील चोंडी येथे पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी तळ्यात गेलेल्या 16 वर्षीय तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,14 सप्टेंबर रोजी मयत विकास रमेश कांबळे हा युवक बैल धुण्यासाठी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तलावात गेला होता, त्यांना पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला, या घटनेची माहिती समजल्यानंतर तहसीलदार रामेश्वर गोरे घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून सूचना केल्या त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता मृतदेह शोधण्यास सुरुवात करण्यात आली रात्री 7 वाजेपर्यंत शोध घेतला परंतु मृतदेह आढळला नाही,रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले,15 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता पुन्हा मृतदेह शोधकार्यास सुरुवात झाली सकाळी 10 वाजता युवकांचा मृतदेह सापडला मयताचे नातेवाईक नामदेव कांबळे यांच्या माहितीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी उदगीर नगरपालिका अग्निशमन दलाचे प्रमुख विशाल आलटे, रत्नदीप पारखे,अश्विन गायकवाड, उमाकांत गंडारे,सुरेश उप्परबावडे,आकाश अंधारे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments