नागलगाव येथे अज्ञाताने शेतकऱ्यांचा ऊस पेटवून दिला,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे शेतकऱ्यांच्या उसाला अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना 28 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की नागलगाव येथील शेतकरी श्रीराम चवळे यांच्या उसाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले उसाला आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांना समजताच या घटनेची माहिती उदगीर येथील अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली असता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होईपर्यंत शेतकऱ्यांचा 2 एकर ऊस जळाला उसात लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली या आगीत शेतकऱ्यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे,नागलगावचे सरपंच सुभाष मुन्ना राठोड यांनी शेतकऱ्यांच्या उसाची पाहणी केली
0 Comments