निधन वार्ता
लालू नाईक खेमा जाधव यांचे हृदय विकारांच्या झटक्याने नांदेड येथे रुग्णालयात निधन
कंधार ■ तालुक्यातील बिजेवाडी तांडा येथील जेष्ठ नागरिक तथा सेवादास महाराज भटक्या विमुक्त जाती मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन तथा उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले व अहमदपूर पोलीस स्टेशन येथे बदली होऊन गेले जमादार शिवाजी जाधव यांचे वडील लालू खेमा जाधव यांचा (९५) व्या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान
ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाला आहे.त्यांचा अत्यंविधी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता त्याच्या राहत्या मूळ गावी बिजेवाडी खेमा तांडा येथे त्यांच्यावर अत्यसंकार करण्यात येणार आहे.त्याच्या पश्चात ५ मुले,२ मुली,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे. ते माजी पीएसआय विठ्ठल जाधव, शिवशक्ती संस्थेचे सहसचिव भगवान जाधव यांचे वडील आहेत.त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरकाल शांती देवो व जाधव परिवारास दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच विक्रांत न्युज पेपर परिवाराकडून ईश्वर चरणी प्रार्थना
0 Comments