पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांचा केला सन्मान
उदगीर: वाढवणा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक भिमराव गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक सोमय मुंढे यांनी प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला,सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड हे उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे असताना त्यांनी अनेक चांगली कामे केली. नुकतीच त्याची वाढवणा पोलीस स्टेशन येथे बदली झाली.सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी वाढवणा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्या नंतर वाढवणा हद्दीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली त्याबद्दल त्यांना पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
0 Comments