Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

देवर्जन येथे गैरकायद्याची मंडळी जमवून एकास मारहाण ९ लोकांवर गुन्हे दाखल

देवर्जन येथे गैरकायद्याची मंडळी जमवून एकास मारहाण ९ लोकांवर गुन्हे दाखल

उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे गैर कायद्याची मंडळी जमवून एकास मारहाण केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ९ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवर्जन येथे प्लॉटचा वाद न्यायालयात असताना आरोपीने प्लॉटवर जावून साफसफाई करीत असताना फिर्यादी हा आरोपींना साफसफाई करू नका जागेचा वाद कोर्टात चालू आहे असे म्हंटले असता  आरोपीने फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात काठी घालून डोके फोडून गंभीर जखमी केले,व साक्षीदारास पण काठीने व लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद तुकाराम दिगंबर खटके यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून नऊ आरोपीवर ९ मार्च रोज बुधवारी रात्री उशिरा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात