Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

प्रॉपर्टीच्या हवास्यापोटी मुलानेच केला आईचा खून,तोंडार पाटी येथील खुनाचा ग्रामीण पोलिसांनी लावला छडा

प्रॉपर्टीच्या हवास्यापोटी मुलानेच केला आईचा खून,तोंडार पाटी येथील खुनाचा ग्रामीण पोलिसांनी लावला छडा

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:तालुक्यातील तोंडार पाटी येथे सखुबाई तुळशीराम वाघमारे वय ५५ वर्ष या महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी उघडकीस आली होती, याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता,खुनातील आरोपींचा शोध लावणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आवाहन होते,

म्हणतात ना कानून के हात बहोत लंबे होते है,

खुनातील आरोपींचा शोध लावण्यासाठी ८ ते ९ लोक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली परंतु या चौकशीत आरोपी निष्पन्न झाले नाही, सर्वांची चौकशी करून सोडून देण्यात आले,

असा लागला खुनातील आरोपींचा शोध,

२४ फेब्रुवारी रोजी जेंव्हा खुनाची घटना उघडकीस आली तेव्हा ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले,ग्रामीण पोलिसांनी मयत महिलेच्या दोन्ही मुलावर बारकाईने लक्ष देत होते, तेंव्हा नागनाथ तुळशीराम वाघमारे यांच्या कपाळावर बारीक खरचटलेली खून दिसली तेंव्हा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी कपाळावर काय लागलंय असे त्याची विचारपूस केली असता त्याने माझ्या पत्नीसोबत शारीरिक सुख भोगताना कपाळावर बांगडी लागल्याने खरचटले आहे असे सांगितले,पोलिसांनी नागनाथ तुळशीराम वाघमारे यांच्या पत्नीला विचारपूस केली असता माझा व माझ्या पतीचा तीन दिवसापासून कसलाच संबंध नाही असे पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांची संशयाची सुई नागनाथ तुळशीराम वाघमारे यांच्या भोवती फिरू लागली होती,परंतु नागनाथ तुळशीराम वाघमारे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी इतर ८ ते ९ लोकांची चार दिवस कसून चौकशी केली,२९ फेब्रुवारी रोजी नागनाथ तुळशीराम वाघमारे यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जागेची वाटणीसाठी आईचा खून केल्याचे कबूल केले,२३ फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीने स्वतःच्या आईच्या  शरीरावर कोयत्याने ७० ते ७२  वार करून निर्घृण पणे खून केला,व पुरावा नष्ट करण्यासाठी आईच्या अंगावरील पूर्ण कपडे काढून आईचा कोणीतरी बलात्कार करून खून केला असा बहाणा केला,आईचा खून करताना नागनाथ तुळशीराम   वाघमारे यांचे कपडे पूर्ण रक्ताने भरले होते,रक्ताने भरलेले त्याचे कपडे २३ फेब्रुवारी रोजी रात्री साई धामच्या बाजूला असलेल्या माळावर जाळून टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली,अखेर ग्रामीण पोलिसांनी सूक्ष्म पध्दतीने तपास करून खुनातील आरोपींना अटक करून ३०२ व २०१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व न्यायालयाच्या आदेशाने आरोपींची ६ मार्च २०२४ रोजी कारागृहात रवानगी करण्यात आली,उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख,पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंढे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल राम बनसोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल चेवले, पोलीस नाईक नाना शिंदे यांनी परिश्रम घेवून खुनातील आरोपींचा छडा लावला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात