मनसेच्या तीव्र ठिय्या आंदोलन नंतर राशनचा काळाबाजार करणाऱ्या वाहतूक कंत्राटदारावर गुन्हा दाखल.
जळकोट - जळकोट तहसील गोदामातुन राशनच्या धान्याचा काळाबाजार करणार्या वाहतूक कंत्राटदारवर जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे, जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली जळकोट तहसील कार्यालयाच्या गेटला तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत नायब तहसीलदार, गोदामपाल, वाहतूक कंत्राटदार कडुन संगनमताने राशनच्या धान्याचा अपहार केला जातो ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेने दि. 23 जाने.2024 रोजी जिल्हाधिकारी,लातूर यांना निवेदन देवुन कळवली त्याच बरोबर रेणापुर, उदगीर ,जळकोट,सह जिल्हातील सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर यांनाही दि.5 मार्च 24 रोजी निवेदन देवुन हा राशनचा काळाबाजार थांबवण्या संदर्भात विनंती केली होती पण वारंवार निवेदने देवुन पाठपुरावा करून यात सर्व अधिकार्यांचे हित संबंध असल्याने जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासना कडुन कसलीही कार्यवाही होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळकोट शासकीय गोदामातुन जाण्याचे व गोदामात स्टींग ऑपरेशन केले त्यात दिनांक 06-03-2024 रोजी जळकोट तहसील कार्यालयाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या गोडाऊन मधून घोणसी राशन दुकानावर जाणाऱ्या वाहनास क्रमांक एम एच 24 जे 9666 थांबून मनसे कार्यकर्त्यांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनातील धान्याच्या कट्ट्यामध्ये दोन ते तीन किलो धान्य कमी आढळून आले त्यावरून गोडाऊन पाल व अतिरिक्त नायब तहसिलदार पुरवठा हिप्परगे जीएस यांच्या समक्ष विचारणा केली असता त्यांनी स्वतः त्या वाहनाची तपासणी केली ज्यामध्ये एकूण 22 कट्ट्याचे वजन करण्यात आले प्रत्येक कट्ट्याचे दोन ते तीन किलो वजन कमी दिसून आले आहे त्या संदर्भाने गोडाऊनपाल हिप्परगे यांनी सदरील वाहनाचा पंचा समक्ष पंचनामा केला त्यात वजन केलेल्या कट्ट्याचे 49, 47 ,48 किलो अशा प्रकारचे सर्व कट्ट्याचे वजन आढळून आले ज्याचे वजन नियमानुसार 50 किलो 500 ग्राम असायला पाहिजे तसेच वाहतूक कंत्राटदाराला ठेका देत असताना महाराष्ट्र शासनाने जी नियम घालून दिलेले आहेत त्या कोणत्याही नियमाचे पालन वाहतूक कंत्राटदारा कडून होताना दिसून आले नाही त्यामध्ये वाहनांमध्ये वजन काटा असणे वाहनास हिरवा रंग नसणे, वाहन चालक मदतनीस हमाल यांचे विमा उतरवलेले नसणे अशा कुठल्याही नियमाचे पालन वाहतूक कंत्राटदारा कडुन होताना दिसून आले नाही सदरील सर्व बाबींचा पडताळा करून पंचा समक्ष पंचनामा करण्यात आला सदरील राशनच्या धान्याचा अपहार करून जीवनावश्यक वस्तू कायद्याची पायमल्ली करण्यात आली आहे तरी दोषी अधिकाऱ्यांवर व वाहतूक कंत्राटदारवर जीवनावश्यक वस्तू कायद्या 1955 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले तब्बल पाच तास हे आंदोलन चालल्या नंतर तहसीलदार जळकोट यांनी पोलिस निरीक्षक जळकोट यांना दोषी वाहतूक कंत्राटदार विरोधात फिर्याद देवुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी जळकोट तालुकाध्यक्ष महेश देशमुख,उदगीर तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे,लातुर शहराध्यक्ष मनोज अभंगे,उदगीर शहराध्यक्ष संतोष भोपळे , रामदास पाटील, दिनेश पवार,शुभम चंदनशिवे, सुनिल तोंडचिरकर, संग्राम केंद्रे,अंकुश नागपुर्णे,गजानन पद्मपल्ले,मधुकर बादुलगे ,शंकर परगेवार,परमेश्वर धोंडापुरे,भानुदास राजेकर,रणजित मालुसरे, राहुल देवकत्ते,धनराज गोंड,रोहित बोईनवाड,दिपक करक्याळे,करणं नागराळे,आरविंद बामणे,फिरोज पिंजारी,सतिश सुर्यवंशी ,परमेश्वर भोसले, बालाजी भिजले, अमोल भिसाडे ,संगम मोरे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.
0 Comments