उदगीर शहरात मुलीचा विनयभंग,पोक्सो अंतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उदगीर:शहरातील आनंद नगर येथे एका मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती असी की.आरोपी शिवलिंग गुणवंत पाटील यांनी फिर्यादीच्या मुलीस सतत इन्स्टाग्रामवर पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधून 25 जुलै रात्री 1 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घराच्या गच्चीवर येऊन तिला बोलावून घेऊन तिच्या शरीराला स्पर्श करून लज्जा वाटेल असे वर्तन करून विनयभंग केला आहे.असी फिर्याद विकास मच्छिद्र चिद्रेवार यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी शिवलिंग गुणवंत पाटील यांच्यावर गुरंन 228/23 कलम 354 (ड) भादवी 8,12 पोक्सो बाल लैंगिक अत्याचार अधिनियम प्रमाणे 25 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक जाधव मॅडम यांच्याकडे देण्यात आला आहे.
0 Comments