नागलगाव येथे मोटरसायकल स्वाराने महिलेला दिली धडक,ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,लातूर येथे महिलेवर उपचार सुरू
उदगीर:तालुक्यातील नागलगाव येथे मोटारसायकलच्या धडकेत एक महिला जखमी झाल्याची घटना घडली, पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती असी की 19 जुलै रोजी राजाबाई जळसिंग बुडगे ही महिला शेताकडे पायी चालत जात असताना लाल रंगाच्या बुलेट स्वाराने महिलेला पाठीमागून जोराची धडक दिल्याने महिला जखमी झाली जखमी महिलेला उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरानी पुढील उपचारासाठी सदरील जखमी महिलेला लातूर येथे पाठविले आहे लातूर येथिल शासकीय रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहे असी फिर्याद सुधाकर जळसिंग बुडगे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी लक्ष्मण प्रल्हाद पाटील यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 279,337,338 भादवी प्रमाणे 23 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने बिट जमादार नाना शिंदे हे करीत आहेत.
0 Comments