Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केंद्रेवाडीतील दिवंगत वीर जवान संभाजी केंद्रे यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केंद्रेवाडीतील दिवंगत वीर जवान संभाजी केंद्रे यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन

लातूर दि.23  केंद्रेवाडीचे सुपुत्र स्व. संभाजी केंद्रे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत राष्ट्र सेवा केली. त्यांचे हे कार्य समस्त केंद्रेवाडीकरांचीच नाही तर लातूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावणारे आहे, तसेच येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणा देणारे असल्याची भावना व्यक्त करून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी  भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 
    अरुणाचल प्रदेश येथे आपले कर्तव्य बजावत असताना चाकूर तालुक्यातील केंद्रेवाडीचे सुपुत्र जवान स्व. संभाजी हरिश्चंद्र केंद्रे यांना वीरमरण आले. भारतीय सैन्यामध्ये गेली १७ वर्ष ते आपली सेवा देत होते.अशा या वीर जवानाच्या केंद्रेवाडीतील त्यांच्या घरी जाऊन श्री. बनसोडे यांनी आज सांत्वन केले.
    या संकट समयी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहोत. वीर जवान संभाजी केंद्रे यांच्या कार्याला आमचा नेहमीच सलाम असेल अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
     यावेळी त्यांच्या समवेत गणेश हाके, केंद्रेवाडी गावचे सरपंच प्रतीक केदार, माजी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, प्रशांत पाटील, अख्तर मिस्त्री, बबन भोसले, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, अहमदपूर डीवायएसपी मनीष कल्याणकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात