डॉ.विलास भारतराव राठोड यांची एस.पी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी संघटक सरचिटणीस पदी निवड
पुणे:येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या ओबिसी विभागाच्या बैठकित जळकोट तालुक्यातील बंजारा समाजाचे युवा नेतृत्व डॉ विलास भारतराव राठोड यांची ओबिसी प्रदेश संघटक सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष्याचे प्रदेश अध्यक्ष आ. शशीकांत शिंदे यांच्या हस्ते निवडिचे पत्र देण्यात आले,यावेळी आमदार रोहित दादा पवार, युवक प्रदेश अध्यक्ष महेबुबभाई शेख,ओबिसी प्रदेश अध्यक्ष राजाभाई राजापुरकर,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष श्री.चंदन भैया पाटील नागराळकर ,उपाध्यक्ष अँड. संजय कलबंदे व सर्व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष्याचे ओबिसी विभागाचे महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.डॉ विलास राठोड यांची निवड झाल्याने जळकोट व उदगीर तालुक्यातील बंजारा समाजाकडून अभिनंदन होत आहे.
0 Comments