Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जळकोट येथील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वप्निल (अण्णा) जाधव

जळकोट येथील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वप्निल (अण्णा) जाधव 

जळकोट (प्रतिनिधी) 
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त लोकप्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचा निर्धार जळकोट तालुक्यातील अण्णाभाऊ साठे प्रेमींनी घेतला आहे. जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे हित जोपासणारे, कामगारांसाठी आपल्या आयुष्याचा वेळ वेचणारे स्वप्निल (अण्णा) अनिल जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी रवी भानुदास नामवाड यांची निवड करण्यात आली आहे. या जयंती महोत्सव समितीच्या सचिव पदी कृष्णा अण्णाराव नामवाड तर कोषाध्यक्षपदी विजय भानुदास नामवाड आणि कार्याध्यक्षपदी संग्राम गंगाधर नामवाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
 यावर्षीची जयंती मोठ्या उत्साहात आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी कार्यक्रम राबवून खऱ्या अर्थाने अण्णाभाऊच्या कार्याचा जागर घालण्याचा निर्धार जयंती महोत्सव समितीचे नूतन अध्यक्ष स्वप्निल (अण्णा) जाधव यांनी व्यक्त केला आहे. शहरातील इतर प्रभागातूनही जयंती साजरी केली जाते. त्या जयंती समितीच्या वतीने सार्वजनिक मिरवणूक काढत असताना जनतेला प्रबोधन करणारे देखावे सादर करावेत. तसेच जयंती महोत्सवामध्ये शांततेला आणि कायदा व सुव्यवस्थेला जास्त प्राधान्य देऊन सर्वांनी जबाबदारीने सामाजिक जाणीव जपत आपला आनंदोत्सव साजरा करावा. अशी अपेक्षाही स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक जाणीव जपणाऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्याची निवड झाल्याबद्दल भारतीय नवनिर्माण लहुजी सेना जळकोट आणि संग्राम भाऊ नामवाडी युवा मंच जळकोट तसेच स्वप्निल अण्णा जाधव युवा मंच यांच्या वतीने असंख्य कार्यकर्त्यांनी स्वप्नील अण्णा जाधव यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात