Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा ( बु.)जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मुलींच्या स्वच्छ्तागृहात, चक्क पुरुष कर्मचाऱ्यांचा वावर.

वाढवणा ( बु.)जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मुलींच्या स्वच्छ्तागृहात,चक्क पुरुष कर्मचाऱ्यांचा वावर.

उदगीर -  प्रतिनिधी*.
उदगीर तालुक्यातील वाढवणा { बु } येथे  मुलीची पहिली ते १० वी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे.तालुक्यातील सर्वात मोठी मुलीची कन्या प्रशाला म्हणून ओळखली जाते, मुलींची शाळा असल्यामुळे आसपासच्या खेड्यातील बऱ्याच मुली या शाळेमध्ये प्रवेश घेऊन, आपल्या उज्वल भविष्याचे धडे गिरवित आहेत. मुली व ६ ते ७ महिला शिक्षिकेसाठी  फक्त एकाचं स्वछतागृहाची सुविधा आहे,  स्वछतागृहाची कडी नसणे, दरवाजा न लागणे, पुरेसे पाणी नसणे, इत्यादी प्रचंड अशी दयनीय अवस्था झालेली आहे, पाहताक्षणी हे  स्वच्छ्तागृह की अस्वच्छ्ता गृह म्हणावे हा प्रश्न मनात उभा राहतो.. कडी व दरवाजा व्यवस्थित नसल्यामुळे  एखाद्या मुलीला बाथरूम साठी जायचे असेल तर अक्षरशः दुसऱ्या मुलीला सुरक्षितता म्हणून बाहेर दरवाजा जवळ थांबवावे लागते, इतकी दयनीय अवस्था या स्वच्छ्ता गृहाची आहे.. यातून कहर म्हणजे पुरुष कर्मचारी ही या मुलींसाठी असलेल्या स्वच्छ्ता गृहाचा सर्रास वापर करत असतात.  प्रचंड अस्वच्छ्ता आणि वॉशरुमला जावे लागते या गोष्टीमुळे बऱ्याच मुली भिवून पाणीचं पीत नाहीत,मागील मुख्याध्यापकांच्या काळापासून मुलीच्या स्वच्छ्ता गृहाची प्रचंड अशी दयनीय अवस्था चालत आलेली आहे.  शाळेला मिळणारा निधी जातो कुठे, व शाळा तपासणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आजपर्यंत का  आलेली नाही , येत नाही. अशी चर्चा पालक वर्गातून होत आहे. एकीकडे शासनाकडून राज्यातील प्रत्येक शाळेत  मुलीसाठी सुरक्षित SOP चे काटेकोर धोरण राबविले जात असताना, दुसरीकडे कन्या प्रशाला वाढवणा येथील शाळेत , शाळा व  स्थानिक प्रशासनाकडून स्वच्छ्ता गृहाच्या माध्यमातून  मुलीची होणारी मानसिक परवड , ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. तरी  प्रशासनाने वेळीच दखल घेऊन स्वच्छ्ता गृहाची  दुरुस्ती व देखभाल करून, आणखी 1   स्वच्छ्तागृह उपलब्ध करून देऊन  मुली व महिला कर्मचारी यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी होत आहे..

Post a Comment

0 Comments

जाहिरात