सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
उदगीर : फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उदगीर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
या शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वेश गुटे हा जिल्ह्यात 36 वा, लोकेश बशेट्टी (हलकीकर) जिल्ह्यात 84 वा तर हर्षदीप पकोळे हा 141 वा आला आहे. या विद्यार्थ्यांना प्रशांत पाटील,अनुराधा धोंड, राचम्मा मलभागे, रोहित पाटील या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भगवानराव वट्टमवार, कार्यवाह डॉ. अंबादासराव देशमुख, उपाध्यक्षा अपर्णा पटवारी, कोषाध्यक्ष मेघ:शाम कुलकर्णी, सहकार्यवाह प्रशांत मांगुळकर, शालेय समिती अध्यक्ष उमाकांत बुधे, मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी, बालाजी रोडे, अनिता शानेवार, दत्तात्रय संकलवड, रामेश्वर पटवारी, सागरबाई कांबळे, दिलीप बिरादार यांनी कौतुक केले आहे.
0 Comments