मतदार संघातील जनतेच्या सुख समाधानासाठी समर्थ धोंडुतात्या चरणी आ.संजय बनसोडे यांचे साकडे
उदगीर : तालुक्यातील प्रतिपंढपुर समजल्या जाणा-या डोंगरशेळकी येथील समर्थ धोंडुतात्या मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी मतदार संघातील जनतेच्या सुख समाधानासाठी समर्थ धोंडुतात्या चरणी मी नतमस्तक होवुन साकडे घातले असल्याचे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, प्रा.श्याम डावळे, माजी उपसभापती रामराव बिरादार, माजी नगरसेवक विजय निटुरे पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, उपसरपंच गणपत पवार, प्रभाकर पाटील हनुमंतराव हंडरगुळे, अभिषेक बरुरे, राहुल पुंड, मारुती मुंडे, बंडू मुंडे, ज्ञानोबा मुंडे, हनुमंत मुंडे, व्यंकटराव मरलापल्ले, नरसन मरेवाड, चंद्रपाल शेळके आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना सुखी ठेवुन पिकांसाठी पुरेसा पाऊस व्हावा अशी प्रार्थना आपण केली आहे. राज्याच्या तिर्थ क्षेत्रातून समर्थ धोंडुतात्या मंदिर संस्थानला ' ब ' दर्जा मिळवून दिला व मंत्री असताना कोट्यावधी रुपयाचा निधी देवून मंदिर परिसर व या डोंगरशेळकी गावचा विकास केला. येत्या काळातही या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवून विकास निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही आ.बनसोडे यांनी दिली.
यावेळी उदगीरसह लातूर जिल्ह्यातील हजारो भाविक - भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments