उदगीरात घरफोडी; रोख रक्कमेसह ६ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास..
उदगीर शहरातील देगलूर रोडवरील सुंदरी नगर येथे एकाच्या घराचा कुलुप कोंडा तोडुन घरात प्रवेश करून घरातील कपाटातील ५ किलो चांदीसह सोन्याची दागिने व रोख रक्कम असा एकुण ६ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेले आहे. याप्रकरणी सोमवारी १४ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ६ ते १३ जुलै दरम्यान शहरातील देगलूर रोडवरील सुंदरी नगर येथे आरोपीने फिर्यादीच्या घराचा कुलुप कोंडा तोडुन घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ५ किलो चांदी प्रति किलो १ लाख १० हजार रुपये प्रमाणे ५ लाख ५० हजार रुपयांची चांदी ५ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत अंदाजे ४० हजार रुपये, ५ ग्रॅम सोन्याचे कानातील रिंग किंमत अंदाजे ४० हजार रुपये व रोख रक्कम ६० हजार रुपये असा एकुन ६ लाख ९० हजार रुपयेंचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्टयाने चोरून घेवून गेला आहे.
याप्रकरणी अडेप्पा शंकरअप्पा अंजुरे (रा. सुंदरीनगर देगलुर रोड, उदगीर ता उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावित्रा रायपल्ले हे करीत आहेत.
0 Comments