मोघा येथे जुगार अड्ड्यावर धाड; ५ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील मोघा गावच्या माळावर असलेल्या रानमाळ हाॅटेल मधील रायडर कल्ब येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून २ लाख ४५ हजार रुपयांसह २ लाख ७४ हजार ५०० रुपयांची मोबाईल असे एकुण ५ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सोमवारी (१४ जुलै) देवणी पोलीस ठाण्यात ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १३ जुलै रोजी रात्री १०:४० सुमारास उदगीर ते बिंदर रोडवर मोघा शिवारातील रानमाळ हाॅटिल येथे रायडर क्लब मध्ये ३७ जणांनी किरकोळ स्वरुपाचा संघटीत गुन्हा करून जिल्हाधीकारी लातूर यानी घालून दिलेल्या परवान्यातील नियम व अटींचे उल्लंघन करुन स्वतःच्या आधीक फायद्यासाठी वेळेची मर्यादा ओलांडुन व नियमाचा भंग करून तिर्रट नावाचा जुगार पैशांवर खेळत व खेळीत असताना ३७ जण मुद्देमालासह मिळुन आले. त्यानी जिल्हाधिकारी लातूर या लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केली.याप्रकरणी पोलीस कर्मचारी पंडीत बजरंग गुणाले यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात कलम २२३ व ११२ भारतीय न्याय सहिंता सह कलम १२ (अ) ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार कल्ब चालक वजीर महेबुबसाब बंगाली (रा.उदगीर) व क्लबचे जागेचे मालक शिवाजी अण्णाराव नेमताबा (पाटील) यांच्यासह महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील एकुण ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वराडे हे करीत आहेत.
0 Comments