Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

साई हॉटेल समोर मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न,तिघां युवकांवर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद

साई हॉटेल समोर मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न,तिघां युवकांवर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद

प्रतिनिधी/संदेश कांबळे
उदगीर:अहमदपूर रोडवरील साई हॉटेल समोर ६ एप्रिल रोज शनिवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास तिघां युवकांनी महिलेच्या हातातील मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, थोडक्यात माहिती अशी की फिर्यादी अश्विनी भास्कर तरटे वय २१ वर्ष राहणार बोळका ता.कंधार जि. नांदेड ह. मु.पंचशील नगर उदगीर ही महिला उदगीर अहमदपूर रोडवरील साई हॉटेलच्या समोर थांबली असता  मोटारसायकल क्रमांक एम.एच.२४ बी.पी.७६९७ वर बसून तीन युवकांनी संगनमत करून फिर्यादीच्या हातातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला,अश्विनी भास्कर तरटे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी योगेश रवी बिरादार, अशोक व्यंकटराव तिमन्ना, आदित्य रवी शिंदे,यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन १९८/२४ कलम ३९३,३४ भादवी प्रमाणे ७ एप्रिल रोज रविवारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.के मुंढे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात