उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळ वाटप
उदगीर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ यांच्या वतीने उदगीर शहरात वृक्षारोपण सामान्य रुग्णालयातील रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे ना संजयजी बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांच्या कल्पनेतून उदगीरचे शहर अध्यक्ष सय्यद जानीमियाँ मोहम्मद हनीफ यांच्या वतीने
सामान्य रुग्णालय, उदगीर येथे रुग्णांना फळे वाटप तर जळकोट रोड येथे मान्यवरांच्या
वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक अनिल मुदाळे, शेख फैय्याज, नजीर हाशमी, गिरीश उप्परबावडे, राजकुमार चव्हाण, व्यंकट बोईनवाड, नवनाथ गायकवाड,शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, अभिजित औटे,अझहर मोमीन, दिपाली औटे, मधुमती कनशेटे, वैशाली कांबळे, काजल मिरजगावे, आजम पटेल,राजकुमार गंडारे, बापू सोळुंके, संघ शक्ती बलांडे, सतिश कांबळे,शेख अमजद, राहुल सुतार, सिद्धार्थ सूर्यवंशी, अविनाश गायकवाड, सय्यद इरफान,हाशमी हिफ्जु रहेमान, मौलाना खालेद, हाफेज अब्दुल, इम्रान शेख,युसुफ बागवान, शेख सलीम, अरुण उजेडकर,पिरखाँ पठाण यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments