Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*शेतकऱ्यांना पिकविम्यासह नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळवून देणार : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे*

*शेतकऱ्यांना पिकविम्यासह नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळवून देणार : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे*

*शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी शासन कटिबध्द*

*उदगीर* : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपले महायुतीचे सरकार खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना वीज, पाणंद रस्ते, विहीरी, मागेल त्याला शेततळे व गोठे यासह पोखरा व अन्य योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून मागील काळात आपल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते त्याचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना पिकविम्यासह नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे  यांनी केले.

ते उदगीर येथे आयोजीत प्रधानमंत्री पिक विमा योजना आढावा बैठकीत शेतक-यांना संबोधित करत होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे,माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, जिल्हा कृषी अधिकारी आर .टी. जाधव, एस.बी.आय विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अक्षय ढोणे, जिल्हा समन्वयक तौसीफ कुरेशी, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र काळे, माजी उपसभापती रामराव बिरादार, जि.प. सदस्य बसवराज पाटील कौळखेडकर, श्याम डावळे, बालाजी भोसले, वसंत पाटील, धनाजी मुळे, ओम पाटील चिघळीकर, राजकुमार बिरादार, शंकर रोडगे, तुळशीराम बेंबडे, युवराज धोत्रे, लक्ष्मण जाधव, उदगीरचे कृषी अधिकारी संजय नाबदे, जळकोटचे कृषी अधिकारी आकाश पवार, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, लातूर जिल्ह्यातील ही पहिली बैठक असुन माझ्या
शेतकरी बांधवांसाठी व मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी मागील ५ वर्ष मी आपला जनसेवक व लोकसेवक म्हणून काम केले.
मागील २ महिन्यात खुप अतिवृष्टी झाली असुन विविध मंडळात पिकांचे नुकसान झाले  आहे.
मागच्या ४ सप्टेंबर रोजी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या दौरा वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या समवेत मी स्वतः शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे शेतक-यांना योग्य तो मोबदला मिळणार आहे. लातुर जिल्ह्यात उदगीर - जळकोट या दोन तालुक्यातीलच नुकसानीचे पंचनामे जास्त झाली असल्याचे प्रशानाने आम्हाला कळवले आहे. मतदार संघातील
१ लाख शेतकऱ्यांनी पिकविमा फाॅर्म भरला आहे. मी सदैव शेतक-यांसाठी जागरुक असतो आपली आनेवारीनुसार शासन आपणास मदत करेल मी सर्वसामान्य कुटुंबातील कष्टकऱ्यांचा मुलगा आहे. मला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणिव आहे म्हणूनच विमा कंपनीला सुचना देवून विमा मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होवु देणार नाही. तालुक्यातील विविध गावात पोखरा योजना राबवणार असुन मतदार संघातील प्रत्येक गावात रस्ते, विज, पाणी, आरोग्याच्या सुविधा पुरविल्या असल्याचे सांगितले.

यावेळी उदगीर तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन व संचालक, कृषी विभागाचे व विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
*********************************

Post a Comment

0 Comments

जाहिरात