Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

इंजि. विश्वजित गायकवाड यांना महाराष्ट्र राज्यपत्रकार संघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

इंजि. विश्वजित गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य
पत्रकार संघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

उदगीर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, जिल्हा शाखा लातूरच्या वतीने आयोजित सामाजिक क्षेत्रातील बाबा आमटे महाराष्ट्र भूषण पुरस्कार-2024 इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाऊंडेशनचे अध्यक्ष विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार देण्याचा मान राज्य संघाने लातूर जिल्हा शाखेवर सोपवला होता. त्यानुसार पुरस्कार वितरण सोहळा मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी 17 सप्टेंबर रोजी लातुरात ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, पत्रकार संघाचे संस्थपाक अध्यक्ष संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे (दिल्ली), मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, प्रा. विठ्ठल कांगणे, ह.भ.प. अनंत माने महाराज, जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, जिल्हाध्यक्ष अशोक देडे आदीच्या उपस्थितीत पार पडला. परंतु याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे विश्वजीत गायकवाड पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकले नव्हते. परिणामी संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, जिल्हाकार्याध्यक्ष अफसर कारभारी, शहराध्यक्ष महादेव डोंबे यांनी गायकवाड यांना त्यांच्या उदगीरच्या कार्यालयात जावून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विश्वजित गायकवाड यांचे कार्य
इंजि. विश्वजीत गायकवाड यांचे उदगीर ,लातूर, ठाणे आणि  भागात मोठे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आहे. विशेष करून ते गरीब मुलांच्या शिक्षणासाठी विशेष मदत करतात . उदगीर, जळकोट  तालुक्यातील शाळांतील वीस हजार   विद्यार्थ्यांना मूलभूत साहित्य देऊन त्यांनी आपले सामाजिक दायित्व निभावले आहे. तसेच  विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपले योगदान देतात. विश्वजीत गायकवाड हे गत 15 वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही सक्रिय असून, ते लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचे पुतणे आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात